रत्नागिरी:- रखडलेल्या महामार्गाच्या कामासंदर्भात वाकन नाका, रायगड येथील पत्रकारांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद तालुका व जिल्हा रत्नागिरीतर्फे नायब तहसिलदार व निवासी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
मुंबई- गोवा महामार्गासंदर्भात मराठी पत्रकार परिषद बरीच वर्षे पाठपुरावा करत आहे. अपुर्ण कामांमुळे मुंबई- गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि तब्बल १२ वर्षे रखडलेले महामार्गाचे काम याचा निषेध करण्यासाठी रायगडमधील पत्रकारांनी आज ९ ऑगस्ट रोजी बोंबाबोंब आंदोलन केले. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद तालुका व जिल्हा रत्नागिरीतर्फे नायब तहसिलदार व निवासी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन रायगडमधील पत्रकारांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. यासोबत जिल्ह्यातील पत्रकारांनी लोकप्रतिनिधिंना एसएमएस पाठवूनही या आंदोलनात सहभाग नोंदवला.
यावेळी प्रशांत पवार,जमीर खलफे,मुश्ताक खान,सतिश पालकर,हेमंत वणजू,रहीम दलाल,राजेश शेळके,भालचंद्र नाचणकर,जान्हवी पाटील, शकील गवाणकर,रुपेश चवंडे, प्रणील पाटील,सिध्देश मराठे, केतन पिलणकर,प्रशांत हर्चेकर,आनंद तापेकर आदी उपस्थित होते.