आदित्य ठाकरे यांच्याकडून समाचार
मुंबई:-गणेशोत्सव तोंडावर आला असताना मुंबई-गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. असे असताना महाराष्ट्रद्रोही सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारचा समाचार घेतला आहे.
गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र सुरू झाली आहे. यामध्ये मुंबईतील कोकणी माणसे लाखोंच्या संख्येने कोकणात जाणार आहेत, मात्र गणेशोत्सवाला अवघा दीड महिना राहिला असताना महामार्गाची दुरवस्था झाली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रस्त्यावर जागोजागी जीवघेणे आणि भयंकर खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनल्याचे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे, मात्र महाराष्ट्रद्रोही सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणतात…
- रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आस लावून बसलेले आणि त्यासाठी सतत तोंड उघडणारे मुंबई-गोवा हायवेवरच्या खड्ड्यांबाबत मात्र गप्प का आहेत?
- की हे मुद्दाम चाललंय? सहनशील कोकणवासीयांना त्रास देण्यासाठी? दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो कोकणवासी जीव मुठीत घेऊन त्रास सहन करतात!