पुणे:-पुण्याजवळ पर्यटकांचं आकर्षण असलेल्या लवासा येथे पंतप्रधान मोदींचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मोदींचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
त्याची उंची जवळपास 190-200 मीटर उंच असेल. यासाठी डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ही कंपनी मोदींचा अतिभव्य पुतळा बनवणार आहे. 31 डिसेंबर 2023 आधी या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता. उद्घाटनाच्या कार्यक्रमात जर्मनी, इस्त्रायल, फ्रांस, संयुक्त अरब अमीरात आणि अमेरिकचे राजदूताचा सहभाग असेल अशी माहितीही मिळतेय. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीला लवासा स्मार्ट सिटीसाठी संकल्प योजना मंजूर केली आहे.