खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील खोपी-गोरेवाडी येथील जंगलमय भागात गतमहिन्यात येथील पोलिसांनी गावठी हातभट्टीचा दारूचा तळ उद्धवस्त केलेला असताना येथील पोलिसांनी मंगळवारी पुन्हा या ठिकाणी धाड टाकून 1 लाख 20 हजार 400 रूपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी रूपेश बाळाजी गोरे (25) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोपी-गोरेवाडी येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर व पथकाने धाड टाकली. या धाडीत गावठी हातभट्टी दारू, दारू करण्यासाठी लागणारा नवसागर व काळा गूळ अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले.