देवरूख:-देवरूख पर्शरामवाडी तिठा येथे गुरांची अवैध वाहतुक करणारी बोलेरो पिकअप गाडी देवरूख पोलीसांनी ताब्यात घेतली. या गाडीत 3 म्हैशी, 3 रेडे यांसह बोलेरो पिकअप असा एकूण 4 लाख 71 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद पोलीस काँन्स्टेबल रोहीत यादव यांनी दिली. अमित गुणाजी घाडीगांवकर व सुरेश शांताराम गजबार दोघेही रा. देवरूख गोपाळवाडी अशी संशयित आरोपींची नावे आहेत. देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार हे मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करताना देवरूख पर्शरामवाडी तिठा येथे रस्त्यालगत बोलेरो पीकअप गाडी उभी असलेली दिसून आली. संशय आल्याने या बोलेरोची तपासणी करण्यात आली. यावेळी बोलेरोमध्ये 6 जनावरे बांधलेली दिसून आली.
चालकाकडे दोन जनारांच्या वाहतुकीचा परवाना होता. मात्र प्रत्यक्षात बोलेरोमध्ये 6 गुरे दाटीवाटीने दिसून आली. ही गुरे कणकवली येथून आणण्यात आली. हौद्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाची जनावरे भरल्याचे फीर्यादीत नमुद करण्यात आले आहे. यानुसार 3 लाख 90 हजार रूपये किमती पांढऱ्या रंगाची बोलरो पीकअप व 81 हजार रूपये किमती 3 म्हैशी व 3 रेडे पोलीसांनी जप्त केले आहेत.
दिलेल्या फीर्यादीनुसार अमित घाडीगांवकर व सुरेश गजबार यांच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात प्राण्यांचे झळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1)(घ)(ड)(च), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119 सह मोटार वाहन 1988 ााs कलम 66/192, भा. द. वि. कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.