चिपळूण:-वन खात्याने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे सापडलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका केली.
चिपळूणच्या पाग नाका भागात किरण केळसकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या शेडमध्ये खवले मांजर आले होते.
केळसकर यांनी वन विभागाच्या वनक्षेत्रपाल राजश्री कीर यांना ते कळवले. त्यानंतर चिपळूणचे वनपाल, कोळकेवाडी, रामपूरचे वनरक्षक तसेच वाहन चालक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने खवले मांजराला पकडले.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पिसे यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या उपस्थितीत खवले मांजराला नैसर्गिक अधिवसात मुक्त केले. विभागीय वन आधिकरी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक श्री. बोराटे, वनक्षेत्रपाल राजश्री कीर यांच मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.