लांजा:लांजा तालुक्यातील अनिरुद्ध कांबळे यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
तालुक्याला प्रथमच मोठे पद मिळाले आहे. अनिरुद्ध कांबळे अनेक वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहेत. या कामाची दखल घेत त्यांची वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्ष संघटना वाढीसाठी करणार असल्याचे कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.