राजापूर:-राजापूर तालुक्यातील सोल्ये रेल्वेस्टेशनजवळील एका हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या खोलीमध्ये अवैधरित्या गोवा तसेच महाराष्ट्र बनावटीची दारू बाळगणाऱ्या एकाला राजापूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळील सुमारे 17 हजार रूपयांचा दारूसाठा जप्त केला. रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सोल्ये रेल्वेस्टेशनजवळील हॉटेल सिध्देशच्या मागील बाजूला असलेल्या खोलीमध्ये नितीन राजाराम शिंदे (52, रा.आंगले, शिंदेवाडी) हा गोवा तसेच महाराष्ट्र बनावटीच्या दारूसाठ्यासह आढळून आला. विनापरवाना दारूसाठा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याजवळील 17 हजार 361 रुपये किंमतीची गोवा व महाराष्ट्र बनावटीची दारू जप्त केली आहे. तसेच नितीन शिंदे याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.