लांजा आडवली रेल्वे स्टेशनवरील घटना
लांजा:- क्रोसिंग दरम्यान रेल्वे प्रवासी महिलेचे दागिने घेऊन पाळणाऱ्या चोरटयाला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. अंकित रामनिवास गौतम असे संशयित चोरटयाचे नाव आहे. ही घटना 30 जुलै रोजी पहाटे 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मडगाव ते रत्नागिरी असा मंगलोर सीएसएमटीने प्रवास करत होती. त्यांच्या पर्समध्ये 6 ग्रॅम वजनाच्या 3 अंगठया, 10 ग्रॅम वजनाची चेन, 7 ग्रॅम वजनाचे एक मंगळसूत्र, 3 ग्रॅम वजनाचे एक पेंडंट असे एकूण 26 ग्रॅम वजनाचे 1 लाख 30 हजारांचे दागिने पर्समध्ये हेते. लांजातील आडवली रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगकरीता ट्रेन थांबली असताना अंकित गौतम याने महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळून गेला. चोरटयाने आपली पर्स पळवताच महिलेने आरडाओरडा केला. रेल्वे पोलिसांनी धावधाव करत या चोरटयाला अखेर पकडले. त्याच्यावर भादविकलम 379, 511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.