दापोली:-दापोलीमधील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असणारी निलिमा चव्हाण (24, राहणार ओमळी-चिपळूण) ही बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाण ही शनिवारी सकाळी 9 वाजता तिची मैत्रीण नीलम पाटेकर हिला सांगून ओमळी येथे जाण्याकरिता बाहेर पडली. शनिवारी संध्याकाळपर्यंत घरी न पोहोचल्याने तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली व ती बेपत्ता झाल्याची फिर्याद तिचे वडील सुधाकर चव्हाण यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. या फिर्यादीनुसार तपास केला असता ती शनिवारी सकाळी दापोली बसस्थानकात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समजले. दापोलीतून खेड येथे ती बसने गेली. खेड येथे देखील ती बस स्थानकावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आली. मात्र तिथून ती पुढे कोठे गेली याचा तपास अद्याप लागलेला नाही. दापोली पोलीस स्थानकात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे.