संगमेश्वर:- तालुक्यातील माळवाशी गावातील वास्करवाडी येथील वहाळावर असणारा लोखंडी साकव अतिवृष्टीत वाहून गेला. गेले काही दिवस मुसळधार पावसाने माळवाशी परिसराला झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या जोरदार पाण्याने ही घटना घडली.
येथील ओढ्यावर असणारा लोखंडी साकव तुटून वाहून गेला. यामुळे पलीकडे असणाऱया वाड्यां संपर्प तुटला आहे. यामुळे ग्रामस्थीं गैरसोय होत आहे. यावर उपाययोजना करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सरपंच अनुष्का सावंत, उप सरपंच सुनिल सावंत यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही बांधकाम विभागाला दिले आहे.
याबाबत उपसरपंच सुनिल सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेवून हा पश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगण्यात आले.