रत्नागिरी:-तालुक्यातील चांदेराई चव्हाटा येथे अवैधरित्या चालणाऱ्या जुगारावर पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. शनिवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल़ी. यावेळी ओंकार अनंत शिंदे हा अवैधरित्या जुगार चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आल़े. त्यानुसार त्याच्याविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदेराई चव्हाटा येथे अवैधरित्या जुगार चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी 29 जुलै 2023 रोजी सायंकाळी छापा टाकल़ा. यावेळी संशयित ओंकार शिंदे हा अवैधरित्या जुगार चालवित असल्याचे दिसून आल़े. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केल़ी. ओंकार याच्याविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र जुगार अधिनिमय 12 (अ) नुसार गुन्हा दाखल केल़ा.