रत्नागिरी:-तालुक्यातील वेतोशी धनगरवाडी येथून दुचाकी चोरीस गेल्याची घटना 29 जुलै रोजी सायं. 6 ते 30 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेतोशी धनगरवाडी येथील रोडवर हिरो कंपनीची डिलक्स एमएच07 एए 0250 ही गाडी उभी करुन ठेवली होती. ही गाडी योगेश शशिकांत तोंडवलकर (डोंबिवली मुंबई) यांच्या नावावर आहे. 29 जुलै रोजी त्यांनी रस्त्यावर गाडी पार्प करुन ठेवली होती. मात्र ही दुचाकी अज्ञाताने चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.