तर सचिवपदी सुनील करगुटकर यांची फेरनिवड
राजापूर:-जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच जैतापूर येथे भरत हरी भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाली.
या सभेमध्ये मागील वर्षाच्या उत्सवाचा आढावा घेतल्यानंतर सन 2023/24 साठी नव्याने कार्यकारणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी राकेश दांडेकर तर सचिवपदी सुनील करगूटकर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. ऊपाध्यक्षपदी महेश नारकर ,खजिनदार वासुदेव नारकर, सहसचिव गजानन करमळकर तर कार्यकारणी सदस्य म्हणून श्रीकृष्ण राऊत, सौ. रेशम लाड, भरतृहरी भाटकर ,निलेश पालकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुढील वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहे या पार्श्वभूमीवर तसेच शासनाच्या आणि अन्य सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याविषयी चर्चा करण्यात आली.
मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.
यामध्ये 350 वा शिवराज्याभिषेक दिन संपूर्ण देशभर साजरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने गडकिल्ले स्पर्धेचे तसेच निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे
दुर्लक्षित आंबोळगड किल्ला येथे श्रमदान व साफसफाई, महिलांसाठी निर्भया कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन , आभाकार्ड, रक्तदान शिबिर, पोस्ट कार्ड स्पर्धा, महिला व मुलींच्या सुरक्षितते संदर्भात सागरी पोलीस ठाणे नाटेच्या सहकार्याने मार्गदर्शन कार्यक्रम घेणे, वृक्ष लागवड आदी उपक्रम राबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध तालुका ,जिल्हा आणि राज्य पातळी पर्यंतची बक्षीसे या मंडळाला प्राप्त झाली असून यावर्षीही सर्व स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. सचिन नारकर आणि विद्यमान सल्लागार संस्थापकीय सचिव गिरीश करगुटकर व सहकारी यांच्या पुढाकाराने सुमारे 24 वर्षांपूर्वी जैतापूर बाजारपेठेतील गणेश चौकामध्ये सुरू झालेला हा उत्सव अव्यातपणे सुरू आहे.
यावर्षी देखील हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा होणार असून यावर्षीची उत्सव मूर्ती विक्रांत नारकर यांनी दिली आहे.
या बैठकीला मंडळाचे सल्लागार गिरीश करगुटकर, दशरथ चाळके, राजन लाड, राजेंद्र प्रसाद राऊत, दीपक नंदुरबारे यांसह नूतन कार्यकारणी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.