संगमेश्वर:- नुकतीच रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत संगमेश्वर तालुका शिवसेना प्रमुख व नियोजन समिती सदस्य प्रमोद पवार यांनी कारभाटले ता.संगमेश्वर येथील घोरपडे घराण्यातील वीरांच्या समाधी संवर्धन व विकासाचा मुद्दा उपस्थित केला.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना कसबा संगमेश्वर येथे मुघल सैन्याच्या तावडीतून सोडविताना प्रखर झुंज देत स्वतःच्या प्राणाचे बलिदान स्वराज्याचे सरसेनापती म्हाळोजीबाबा घोरपडे, त्यांचे बंधू व तीन पुतने असे एकूण पाच घोरपडे घराण्यातील योध्दे धारातिर्थी पडले. पाचही वीरांच्या समाध्या कारभाटले ता.संगमेश्वर येथे दुर्लक्षीत, पडझड झालेल्या स्थितीत आहेत.
हे ऐतिहासिक समाधीस्थळ विकसित करून,देशाच्या नकाशावर आणण्याचा संकल्प रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
भविष्यात हे समाधीस्थळ ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून पुर्णत्वास गेल्यास पुढील पिढीसाठी ते एक प्रेरणास्थान होईल. तसेच म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे वंशज, सर्व शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक- संशोधक यानांही समाधान वाटेल. असे आपले परखड मत संगमेश्वर तालुका शिवसेनाप्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रमोद पवार यांनी व्यक्त केले आहे.