खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील आंबवली-महादेवनगर येथे जमिनीच्या वादातून हातातील दगड फेकून मारत दुखापत केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. फिर्यादीस माझ्या जमिनीत नारळ का पुरलास? असे बोलून शिवीगाळ केली व दगड फेकून उजव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.