ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाच्या वर्धापन दिनी वक्तव्य
संगमेश्वर:- ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाचा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला.या वर्धापन दिनानिमित्त ‘ग्रामीण भागातील समस्या’ या विषयावर मान्यवरांच्या हस्ते डिजिटल विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.त्याच बरोबर ‘रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या समस्या’ या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रामध्ये गाव विकास समितीचे संघटन प्रमुख तथा पत्रकार सुहास खंडागळे, सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे, महीला संघटना अध्यक्षा दिक्षा खंडागळे आदींसह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
या चर्चासत्रामध्ये आज पर्यंत ग्रामीण भागाचा विकास का झाला नाही? या वर व्यक्त होताना सुहास खंडागळे यांनी सांगितले की, विविध क्षेत्रातील शिक्षण घेतल्यानंतर कोकणातून रोजगारासाठी होणारे तरुणांचे स्थलांतर हा चिंतेचा विषय आहे.मुळात आपल्या रत्नागिरी आणि विशेषतः कोकणातील लोकांची मानसिकता बनली आहे की इथे शिकायचं आणि मुंबई,पुणे,कोल्हापूर,सांगली अश्या ठिकाणी जाऊन नोकरी करायची.दहावी बारावी झाली की तरुण नोकरीसाठी आपले गाव सोडून दुसरीकडे जातात,त्यामुळे स्थलांतर वाढले आहे.गावात तरुणांना रोजगार नसल्याने गावांचा विकास रखडला आहे.सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे. सत्ताधारी आपल्या मनाला वाटेल तसे वागत असून ग्रामीण भागाच्या विकासाची दूरदृष्टी आजच्या नेतृत्वामध्ये नाही.गावांच्या विकासासाठी तरुणांनी आता पुढाकार घ्यायला हवा.आपल्या गावाच्या विकासासाठी जागरूक असायला हवे असे खंडागळे यावेळी म्हणाले.
पुढे ग्रामीण भागातील पाणी समस्या,शिक्षण समस्या,आरोग्य समस्या,रस्ते,अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यानंतर ग्रामीण समस्या या विषयावर डिजिटल अंकाचे प्रकाशन करण्यात आले.हे प्रकाशन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे, गाव विकास समितीचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष व निवळी गावचे सरपंच दैवत पवार,साखरपा विभाग अध्यक्ष व मोर्डे ग्रामपंचायत सदस्य नितीन गोताड,संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष प्रशांत घुग,महीला संघटना अध्यक्षा दिक्षा खंडागळे,देवरूख विभाग अध्यक्षा अनघा कांगणे,सदस्य महेंद्र घुग तसेच संपादक मुझम्मील काझी उपस्थित होते.