संगमेश्वर/धनंजय दळवी:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सीमा शेट्ये यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन चरित्राचा थोडक्यात आढावा घेताना त्यांचा जन्म, शिक्षण, पत्रकारिता इत्यादी मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळकांसारख्या महापुरुषांचे चरित्र, कर्तृत्व खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीने जाणून घ्यावे, तसेच आपल्या पुढील आव्हानांचा विचार करून त्या दृष्टीने भविष्यात वाटचाल करावी असे आवाहन केले.
लो.टिळक जयंती निमित्त कनिष्ठ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमान्य टिळकांची पत्रकारिता’ व ‘भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक’ असे दोन विषय देण्यात आले होते.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे:-
प्रथम क्रमांक- स्नेहा नितीन शेट्ये
द्वितीय क्रमांक-
(विभागून) श्रुती महेंद्र सागवेकर, गौरी महेंद्र सागवेकर आणि तन्वी मनोहर साळुंखे.
तृतीय क्रमांक- ऋतुजा रमेश पवार.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. संदीप मुळ्ये यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रवीण जोशी, प्रा. मयुरेश राणे, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. देवयानी जोशी आणि प्रा. शिवराज कांबळे यांनी मेहनत घेतली.