संगमेश्वर / प्रतिनिधी:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व कार्याध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने संगमेश्वर व चिपळूण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आशा व आरोग्य सेवक आणि सेविका यांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने व मित्र मंडळाच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. गुरुवारी सुमारे एक हजारापेक्षा अधिक रेनकोटचे वाटप यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचा शुभारंभ बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्र येथून माजी आमदार सुभाष बने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार श्री. बने म्हणाले आरोग्य विभागातील कर्मचारी वृंद नेहमीच आघाडीवरती राहून काम करत असतात त्यांना भेटून कौतुकाची थाप देण्याबरोबरच एक प्रेमाची छोटीशी भेट द्यावी याकरिता आम्ही आपल्यापर्यंत आलो असल्याचे स्पष्ट केले.
बुरंबी येथील कार्यक्रमात व्यासपीठावर संजय नाखरेकर, तालुका युवा अधिकारी तुषार उर्फ मुन्ना थरवळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही आर रायभोळे, शिवसेनेचे शरद बाईत, संदेश शिवलकर, चंद्रकांत सागवेकर, नितीन पवार यावेळी उपस्थित होते.
यावेळी या रुग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. याप्रमाणे देवरुख ग्रामीण रुग्णालयामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते रेनकोट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश कदम, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा महिला संपर्कप्रमुख नेहा माने, रत्नागिरी जिल्हा संघटक वेदा फडके, नंदादीप बोरकर छोट्या गवाणकर, वैभव पवार, संतोष लाड, विकास जागुष्टे आदीसह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. तर माखजन कडवई धामापूर निवे खुर्द आदी अनेक जिल्हा परिषदचे माजी सदस्य शंकर भुवड, माजी उपसभापती दिलीप सावंत, सुजित महाडिक, प्रकाश घाणेकर, सारिका जाधव, सुभाष नलावडे, सुबोध पेडणेकर, राजू जाधव, किरण जाधव, बाबा दामुष्टे, इस्तियाक कापडी, सचिन इप्ते, तेजस शिंदे, बाबू मोरे, बबन बोदले, पप्पू गोवळकर, ललिता गुडेकर, संतोष अणेराव आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
गुरुवारी दिवसभर तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्र बरोबरच तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालय आणि चिपळूण तालुक्यातील ६ शासकीय रुग्णालयातील आणि चिपळूण नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.