संगमेश्वर/मकरंद सुर्वे:-संगमेश्वर तालुक्यातील निढळे वाडी येथे नऊ वर्षांपूर्वी आले एक स्वप्न पाहिलं ते पालकांना दाखविले आणि सुरू झाला आदर्श शाळा बनविण्याचा प्रवास असे हे दोन शिक्षक श्री मधुकर राव वाजे व श्री आनंद हर्डीकर हे जि प शाळा मराठी निढळवाडी येथे हजर झाल्यापासून शाळेला आदर्श बनविण्याचा ध्यास घेतला परंतु दोघांचीही बदली झाल्याने त्यांना नुकताच त्यांचे श्रीफळ व भेटवस्तू देऊन प्रेमाचा निरोप देण्यात आला या शिक्षकांनी स्थानिक नागरिक पालक तसेच माजी विद्यार्थी वर्ग यांच्याशी स्नेहाचे संबंध प्रास्तावित केले शाळा कमिटी अध्यक्ष प्रदीप वाडकर आणि सहशिक्षकाने मोलाची साथ मिळवली शासनाच्या योजनेतून नवीन शाळा इमारत बांधून दिली.
नंतर माजी विद्यार्थी यांच्या देणगीतून इमारतीला रंगरंगोटी करण्यात आले व सर्व कार्यामध्ये आघाडीवर होते ते श्री मधुकर वाजे यांचा निरोप समारंभ च्या वेळी मुंबई मित्र मंडळ सर्व श्री जीवन वाडकर ,मधुकर वाडकर ,कुलदीप वाडकर, सचिन वाडकर ,समीर वाडकर ,अनिल वाडकर, प्रशांत वाडकर ,यश वाडकर ,आकाश बोंडवलकर, आदींनी उपस्थित ती राहून शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना वयाचे वाटप व बालवाडीतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ महिला मंडळ पालक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते