नवी दिल्ली:-स्वित्झर्लंडमध्ये झ्युरिक येथे 16 ते 25 जुलै या कालावधीत झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत (आयसीएचओ) भारतीय विद्यार्थ्यांनी अत्युत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत जागतिक पातळीवर मोठी प्रशंसा आणि मान्यता मिळवली.
या प्रतिष्ठित स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि तीन रौप्य पदकांची कमाई करत भारतीय संघाने उल्लेखनीय कौशल्याचा आविष्कार केला.
समग्र स्तरावर पदकतालिकेत सात इतर राष्ट्रांसह भारत 12व्या स्थानावर आहे.(पुष्टी होणे बाकी)चीन आणि सिंगापूर या देशांनी प्रत्येकी चार सुवर्णपदके मिळवली आहेत तर तैवान,इराण,व्हिएतनाम तसेच एक वैयक्तिक सहभागी (बहुधा रशियातील)यांनी प्रत्येकी 3 सुवर्णपदके तर जपान,अमेरिका,उजबेकिस्तान,आर्मेनिया आणि बल्गेरिया यांनी प्रत्येकी 2 सुवर्णपदके जिंकली. यावर्षी जगभरातील 87 देशातून आलेले 348 विद्यार्थी, आयसीएचओच्या झेंड्याखाली खेळणारे दोन संघ यांनी आयसीएचओ मध्ये उत्कृष्टतेचे दर्शन घडविण्यासाठी स्पर्धेत भाग घेतला.
देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारे विजेते भारतीय विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत:
क्रिश श्रीवास्तव (नोईडा,उत्तर प्रदेश )- सुवर्णपदक
अदिती सिंग (अहमदाबाद,गुजरात) – रौप्यपदक
अवनीश बन्सल (मुंबई,महाराष्ट्र) – रौप्यपदक
मलय केडिया (गाझियाबाद,उत्तर प्रदेश)- रौप्यपदक