रस्ता दुरूस्तीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
दापोली:- तालुक्यातील उसगाव या गावात भारती शिपयार्ड नावाच्या जहाज बांधणी क्षेत्रातील आंतराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीमुळे उसगावचे नाव देशाबरोबरच देशाबाहेरही गेले. अशा या उसगावात येण्यासाठी एक दाभोळकडून मार्ग येतो तर दुसरा मार्ग हा आगरवायंगणी या महसुली गावाच्या हद्दीतून उसगावला येतो.
सध्या या दोन्ही मार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे.
उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनीमुळे अनेकांचा रोजगार नोकरी हा आहे तसेच अनेकांना लहानसहान व्यवसायाची संधीही मिळाली आहे. भारती शिपयार्ड कंपनीच्या माध्यमातून रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणाऱ्या उसगावात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने करायला हवे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.