पोलिसांनी लावले बॅरिकेट्स
संगमेश्वर:-मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्फोटके घेऊन टँकर जात आहे. डीजी कंट्रोल रुम मुंबई येथून फोन येताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. नाकाबंदी करण्यात आली. वांद्री येथील पूर्णब्रह्म हॉटेलसमोर या टँकरचा पाठलाग करुन पोलिसांनी टँकर पकडला. पोलिस कसून तपास करत आहेत. मात्र या टँकरमध्ये काहीच संशयास्पद नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पॉलिथिन बनवण्यासाठीचे सामान असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र टँकरमध्ये काहीच संशयास्पद न सापडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.