प्रतिनिधी / लांजा
लांजा तालुक्यातील आरगाव कुणबीवाडी येथून 73 वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याची फिर्याद पत्नी नर्मदा हिने गुरुवार दि.20 जुलै रोजी लांजा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पत्नी नर्मदा चिबडे हिने पोलीस ठाण्यात केलेल्या फिर्यादीनुसार पती नरेश सोनू चिबडे (वय 73) व पत्नी नर्मदा चिबडे हे दोघे मंगळवार दिनांक 18 जुलै रोजी रिंगणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचारासाठी गेले होते. त्या ठिकाणी उपचार करून पुन्हा ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रिंगणे येथून आरगावकडे वाटेतून चालत जात होते. यावेळी पती नरेश हे आपल्यापासून काही अंतर पुढे जात होते. आपण घरी आलो मात्र पती नरेश चिबडे हे घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला, शेजारीपाजारी तसेच नातेवाईकाकडे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र कोठेही त्यांचा ठाव ठिकाणा आढळून आला नाही.
अखेर नर्मदा चिबडे यांनी पती नरेश चिबडे हे बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात दाखल केली असून नरेश चिबडे हे कोणाला आढळून आल्यास पोलीस ठाण्याशी संपर्प साधण्याचे आवाहन लांजा पोलीसांच्यावतीने करण्यात आले आहे.