रत्नागिरी:- आयसीएआयला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी शाखा आणि जाणीव फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात ३२ जणांनी रक्तदान केले.
सीए आणि सीएंच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आणि जाणीव फाउंडेशनच्या सभासदांनी रक्तदान केले. या उपक्रमाकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय आणि रक्तपेढीचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
आयसीएआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यातील रक्तदान हा एक उपक्रम होता. रत्नागिरीतील शिबिराला सीए इन्स्टिट्यूटचे रत्नागिरी शाखाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, विकासा अध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सदस्य सीए प्रसाद आचरेकर, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे आणि पदाधिकारी, सहकारी उपस्थित होते.