राजापूर:- शहरातील पूरस्थिती ओसरत असली तरी दोन दिवसांपासून शाळांच्या एसटी फेऱ्या बंद असल्याने राजापूर आगाराचे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
राजापूर तालुक्यातील गेले चार-पाच दिवस भरपूर पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली.
तसेच २० जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे शाळांच्या सर्व फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या. आजही शाळा बंद होत्या. तसेच उद्याही बंद राहणार आहेत. शाळांचे विद्यार्थी, शिक्षक शाळांमध्ये न आल्याने एसटीचे नुकसान झाले.