रत्नागिरी:- रत्नागिरीत उद्योजकांसाठी येत्या रविवारी (दि. २३ जुलै) हेल्थ अँड हॅपिनेस वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा रत्नागिरी चॅप्टर, आर्ट ऑफ लिविंग आणि गुर्जर आयुर्वेद चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत कार्यक्रमाचे आयोजन उद्योजकांसाठी करण्यात आले आहे.
व्यवसायाच्या धावपळीत उद्योजकांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. ते लक्षात घेऊनच ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्श कलेक्शनच्या मानसी महागावकर आणि गुर्जर आयुर्वेदचे डॉ. आशुतोष गुर्जर प्राणायाम, ध्यान, श्वास आणि आहाराविषयी माहिती आणि मार्गदर्शन करणार आहेत.
रविवारी सकाळी ६ ते साडेसात या वेळेत साळवी स्टॉप येथील माध्यमिक शिक्षण पतपेढी जवळ बाळासाहेब ठाकरे यूथ अॅक्टिव्हिटी सेंटर हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० उद्योजकांनाच प्रवेश दिला जाईल. सॅटर्डे क्लबच्या सदस्यांना त्यात प्राधान्य असेल. नोंदणीसाठी सौ. मानसी महागावकर (9890991407) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.