मंडणगड:- लोकरवण पेवे पंदेरी मार्गावरील लोकरवण येथील पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या लोंढ्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. अनेक वर्षापासून या पुलाची उंची वाढवा ही मागणी येथील ग्रामस्थांकडून होत असतानाही ती पूर्ण होत नाही त्यामुळे पुन्हा एकदा पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मंडणगड तालूक्यातील म्हाप्रळ या गावानजीक लोकरवण हे गाव आहे या लोकरवण गावाच्या हद्दीतून पेवे पंदेरी घोसाळे पाचरळकडे जाणारा एक महत्त्वाचा मार्ग या मार्गावर या गावांसह उंबरशेत, पडवे, दंडनगरी, कोंडगाव आदी गावांचे दळणवळण या एकमेव रस्त्यावर अवलंबून आहे.
या मार्गावर लोकरवण येथे एक पूल आहे. त्या पुलावर पावसाच्या पुराचा लोंढा वाहू लागल्याने या पुलावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. त्यामुळे मंडणगड तालुक्यातील लोकरवण, पेवे, पंदेरी, कोंडगाव, पडवे, उंबरशेत या गावांचा संपर्क तुटला आहे.