मुंबई : खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही वेळापुर्वीच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेत विचारपूस केली.
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचा उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज राहावे, असे आदेश अदिती तटकरे यांनी दिले आाहेत.
इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना महाराष्ट्र शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. इथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत.