मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी हे गाव दरड कोसळल्यामुळे पुर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते.
खराब हवामानामुळे मदतकार्यात अडचण निर्माण होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु असलेल्या मदतकार्याची आणि घटनेची माहिती पत्रकारांना दिली. सोबतच दुर्घटनाग्रस्तांना पुर्ण मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. मुख्यमंत्री म्हणाले की, या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत केली जाणार आहे. सोबतच इर्शाळवाडी गावाचे पुनर्वसन केले जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १०० पैक्षा अधिक लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. खराब हवामानामुळे मदतकार्यात जरी अडचण येत असली तरी, मदतकार्य चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गिरीश महाजन हे देखील घटनास्थळावर हजर आहेत.