संगमेश्वर:-विसावा हॉटेल ते आरवली गडनदी वरील पूल दरम्यान च्या रस्त्याची उंची वाढवावी असे गेली दोन वर्ष वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटूनही कार्यवाही झाली नसल्याने संबंधित महामार्ग अधिकारी व ठेकेदार त्यांच्या मनमानीपणामुळेच यावर्षीच्या अतिवृष्टीतील पहिल्याच पावसात सदर ठिकाणी महामार्ग पाण्यात जाऊन वाहतूक बंद करण्याची नामुष्की ओढवली त्यामुळे प्रवाशांची मात्र खूपच गैरसोय झाली . याला संबंधित अधिकाऱ्यांच्या व ठेकेदाराच्या मनमानी व बेजबाबदारपणा मुळेच झाला असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की,खेरशेत विसावा हॉटेल ते आरवली गडनदी पुल दरम्यान असणाऱ्या महामार्गची उंची गडनदी पुलाच्या उंचीच्या मानाने पाच – सहा फुट कमी आहे,असे असताना खेरशेत ते गडनदी महामार्गाचे काम अंतिम टप्यात चालू आहे, त्यामुळे अतिवृष्टीत पुराचे पाणी रस्त्यावर आले. दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी पुराच्या पाण्याने सुमारे सात फुट एवढ्या उंचीचे पाणी महामार्गांवर आले होते ,त्यामुळे महामार्ग तब्बल दोन बंद होता,प्रवासी अडकले होते,त्याची पुनर्वृत्ती होऊ नये म्हणून पुलाच्या उंची एवढाच भराव करून महामार्गाची उंची वाढवण्यात यावी.असे सदर बांधकाम ज्यांच्या आधीपात्याखाली चालू आहे त्या महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांना व संबंधीत बांधकाम कंपनीच्या ठेकेदारांना भेटून सदरील वस्तुस्थिती त्याना सांगूनही त्यांनी सदर बाबीकडे दुर्लक्ष केल आहे, पुलाची उंची वाढवली मात्र लगतच्या महामार्गाची उंची न वाढवल्यामुळे पुराचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक बंद होत असेल तर पुलाची उंची वाढवून उपयोग काय? जेवढी पुलाची उंची आहे तेवढीच महामार्गाची उंची असायला पाहिजे, अशी येथील जनतेची मागणी असताना जर महामार्गाचे अधिकारी मनमानी व बेजबाबदार वागत असतील तर व महामार्ग पाण्याखाली जात असेल तर त्याला जबाबदार कोण? संबंधित अधिकारी पूर्वीच्या सर्व्हे प्रमाणेच आम्ही काम करणार अस सांगणं कितपत योग्य आहे?सर्व समान्य माणसाच्या नजरेत सदर उंची कमी असल्याचे दिसते ते संबधित यंत्रणेच्या इंजिनीयर्ना दिसत नसेल तर त्यांच्या बाबतीत साश्ंकता वाटते, दोन वर्षांपूर्वी सदर रस्त्यावर सात फुट पाणी होते ते कॉन्ट्रॅक्टर व संबंधित अधिकारी यांनी पाहिलं असतानाही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराने घिसाडघाईने काँक्रिटचा सहा इंचाचा कच्चा थर टाकला असून त्यावर आता दुसरा एक फुट काँक्रिटचा पक्का, अंतिम थर टाकून ठेकेदार काम पूर्ण करण्याच्या तयारीत आहे, मात्र तसे झाल्यास आम्हला आंदोलन करून ते काम थांबवावे लागेल, परिणामी कायदा सुववस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारच जबाबदार असतील.
खेरशेत ते संगमेश्वर या महामार्गांवर सुमारे दहा ते बारा फुट उंचीचे १३दगडी बांधकामाच्या ब्रिटिश कालीन कमानी मोऱ्या होत्या (भोगदे होते).त्या भोगद्यातून शेतकरी आपल्या गुरा -ढोराना व शेतीची साधन घेऊन अलीकडचे -पलीकडचे शेतकरी ये -जा करत होते.तसेच वन्यप्राणी देखील या मोऱ्यातून ये -जा करत असत. पण आता जे महामार्गाचे काम चालू आहे, त्यामध्ये या तेराही ही मोऱ्या कोसळून या ठिकाणी ३-४ फुट उंचीच्या पाईपमोऱ्या टाकण्यात आल्या आहेत, त्यामुळे मोऱ्या कचर्याने चोदून महामार्गांवरून पाणी जाण्याचे प्रकार घडले आहेत, वन्यप्राणी, शेतकरी, गुर-ढोर यांचा कोणताच विचार करण्यात आला नाही, ब्रिटिश कालीन इंजिनिअरना जी दूरदृष्टी होती ती आताच्या इंजीनिअरना नाही अस म्हणावं लागेल.
तरी संबंधित समस्येचा अधिकारी व ठेकेदार यांनी सहानभूतीपुर्वक विचार करून खेरशेत विसावा हॉटेल ते गडनदी पूल दरम्यान १००मीटर लांबीच्या महामार्गाची उंची पुला एव्हडी वाढवण्यात यावी अशी विनंती आहे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी केली आहे.