रायगड:-छत्रपती शिवाजी महारांजाची राजधानी असलेल्या रायगडाच्या मजबूतीमागील रहस्य उलगडले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने नव्याने केलेलेल्या संशोधनात रायगडाचे जतन करणाऱ्या एका पातळ थराचा शोध लावला आहे.
या पातळ थराचे नाव ‘पॅटिना’ (Patina) असे आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या बांधकामावर, किंवा दगडांवर सुक्ष्म वनस्पतीच्या थराची वाढ होते. हा शेवाळ्यासारखा दिसणारा वनस्पतींचा सुक्ष्म थर वर्षानुवर्षे त्या वास्तूचे जतन करण्यासाठी मदत करते. शास्त्रज्ञांच्या मते रायगडावर पॅटिना आढळले आहे, आणि त्यामुळे गेली अनेक वर्षे वाऱ्या पावसातही ताठ मानेने उभा आहे.
एएसआयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्यामते गेली अनेक वर्षे रायगड किल्ल्यावरील बेसाल्ट दगडी भिंतीवरील कॅल्शिअम ऑक्सिलेट पॅटिना शतकानुशतके गडाचे रक्षण करत आहेत. हे आमच्या नवीन संशोधनातून समोर आले आहे. सूक्ष्मजीवांनी तयार केलेला हा पॅटिना आर्द्रता, आणि हवामानापासून दगडांचे संरक्षण करत आहेत. या संशोधनाच्या विश्लेषणाचा निष्कर्ष एमडीपीआय इंटरनॅशल जर्नल ऑफ हेरिटेज या जरनलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
हा थर एकसमान सबस्ट्रेटला घट्टपणे चिकटून राहतो, धूळ, पावसाचे पाणी, वादळी वारा, यापासून तो आपल्या सबस्ट्रेटचे संरक्षण करते. फर्न, टेरिडोफाइट्स, ब्रायोफाइट्ससह, लोअर क्रिप्टोग्राम सारख्या वनस्पतींपासून झालेल्या या थराने बेसाल्टिक दगड संरक्षित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या सूक्ष्म वनस्पतींमध्ये मुळे, देठ, आणि पाने नसतात परंतु ते तयार करत असलेल्या ऑक्सिलिक अॅसिडमुळे संरक्षण होते. ऑक्सिलिक अॅसिड विविध वनस्पंतमध्ये आढळणारे एक नैसर्गिक सेंद्रिय अॅसिड, चेलिटिंग एजंट म्हणून काम करते. जेव्हा हे सेंद्रिय अॅसिड दगडाच्या कॅल्शिअमच्या संपर्कात येते तेव्हा ते पृष्ठभागावर संरक्षणात्मक कॅल्शिअम ऑक्सलेटचा थर तयार करते. कॅल्शिअम ऑक्सलेटचा थर दगडाची झीज होण्यास प्रतिकार करते. तसेच पाणी आणि इतर सॉल्व्हेंट्सपासून दगडाचे संरक्षण करते.
माजी एएसआय शास्त्रज्ञ सिंग, यांच्यामते कॅल्शिअम ऑक्सलेट पॅटिना नैसर्गिक ढाल म्हणून काम करते, गडाच्या बेसाल्ट दगडांना प्रदूषण आणि पर्यावरण ऱ्हासापासून संरक्षण करते.