रत्नागिरी:- मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे रखडलेल्या खरीप हंगामातील शेतीकामांना आता वेग आला आहे. भातशेतीच्या ५० टक्के क्षेत्रावरील लावणीची कामे म्हणजेच ३४ हजार २३८ हेक्टर क्षेत्रावरील लावणी पूर्ण झाली आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे दमदार आगमन झाले; मात्र त्यानंतरही चार दिवसांनी पुन्हा सरींचा पाऊस सुरू झाला. आषाढ आमावस्येपर्यंत जिल्ह्यात अनियमित पाऊस होता. गेले दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असून, त्याचा फायदा भात लावण्यांना होणार आहे. उशिरा केलेल्या पेरण्यांची रोपे लावणीयोग्य होण्यासाठी अजून चार ते पाच दिवस लागतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शंभर टक्के लावणी पूर्ण होण्यासाठी अजून आठ दिवसंचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुका भात (हेक्टरी) नाचणी (हेक्टरी)
- दापोली ३०८३ १३.७
- मंडणगड २४३८ ६०.३९
- खेड २८६० ९.०५
- गुहागर २५०३ २३.८
- चिपळूण ३७९७ ३०.७२
- संगमेश्वर ५५२० ०
- रत्नागिरी ५९४० ५०.६९
- राजापूर ५४८५ ३.१
- लांजा २६१० ४.३४