मुंबई:-हृदय पिळवटून टाकणारी घटना काही तासांपूर्वी घडली होती त्यांनतर आता चमत्कारिक घटना समोर आली आहे. बापाच्या हातून पडून नाल्यात वाहून गेलेले 4 महिन्यांचं बाळ जिवंत सापडल आहे. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय येथे दिसून आला.
अंबरनाथ लोकल उभा राहिली असताना काही प्रवाशी लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते. तेव्हा एका महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातात असलेलं चार महिन्यांचं बाळ नाल्यात पडून वाहून गेले. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. अखेर शोधाशोध केल्यानंतर ते बाळ झाडाच्या फांद्यामध्ये अडकलेला स्थितीत दिसून आलं. बाळाला जिवंत पाहून आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. देव तारी त्याला कोण मारी, असा चमत्कार या ठिकाणी पाहायला मिळाला. बाळाची भेट आईशी झाली आणि सगळ्यांनी देवाचे आभार मानले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुपारी तीनच्या सुमारास अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान २ तास उभा होती. यावेळी काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यात एका लहान बाळाला घेऊन त्या बाळाची आई आणि एक व्यक्ती निघाले होते. तेव्हा त्यांच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटून नाल्यात पडले. पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत बाळ वाहून गेल्याची ही दुर्देवी घटना घडली होती. त्या बाळाचा शोध घेण्यात आला. अथक परिश्रमानंतर ते बाळ एका झाडाच्या फुडपांमध्ये अडकलेले दिसले. बाळाला जिवंत पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. तिने बाळाला घट्ट मिठी मारली. आईची आणि बाळाची भेट पाहून सगळ्यांना अश्रू अनावर झाले.