संगमेश्वर:- गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरातील आरवली येथे असलेला पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे. लांबच लांब रांग लागलेल्या आहेत. आधीच पावसामुळे हैराण झालेले प्रवासी आणि वाहन चालक आणखी बेजार झाले आहेत.