खेड / इक्बाल जमादार:-खेडमधील जगबुडी नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सुमारे 40 गावांचा संपर्क तुटला आहे
गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नारंगी जगबुडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील संगलट पन्हाळजे मार्गावरची संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. खेड बाजारपेठेमध्ये देखील पुराचे पाणी घुसल्याने अनेक व्यापारी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक व्यापारी बांधव आपल्या दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न करीत आहे
तसेच पुरामुळे दापोली मार्गावरच्या देखील सर्व वाहने बंद आहेत. काही खाजगी गाड्या व एसटी गाड्या देखील डेंटल कॉलेजच्या पलीकडे सुर्वे इंजिनिअरिंगच्या ठिकाणी पूर आल्याने पाणी भरल्याने गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनेक लोक आपल्या कामासाठी खेड बाजारामध्ये गेल्याने अडकून पडले आहेत.