चिपळूण/प्रतिनिधी: नुकताच चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षेचा निकाल लागला, त्यामध्ये चिपळूणमधील ५ विद्यार्थी सीए सुरभी साप्ते, सीए जाई ओक,सीए हर्षदा केतकर, सीए चैतन्य चितळे, सीए अवधूत सरदेसाई सीए परिक्षेत उत्तीर्ण झाले. आज या नुकतेच सीए झालेल्या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्ष चिपळूण यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी एलएलबी परिक्षेत यश संपादन केलेल्या हर्षद केळकर, राजपूत मॅडम यांनाही गौरवण्यात आले. तसेच चिपळूणमधील जिज्ञासा क्लासेसचे विनायक केळकर यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अंदाजे ३५०० किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पायी पुर्ण केली, याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात बोलताना सत्कारमुर्तीनी आपले अनुभव सांगितले व मनोगत व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे व जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी आपल्या भाषणातून सत्करमूर्तींचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला सुरेखा खेराडे, रामदास राणे, आशिष खातू, परिमल भोसले, विजय चितळे, विनोद भोबसकर, सचिन शिंदे, सुधीर शिंदे, निनाद आवटी, श्री. चिपळूणकर, मंदार कदम, मधु निमकर, प्रभंजन पिंपीटकर, सुनित खेराडे व पालक उपस्थित होते. मंदार कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आशिष खातू यांनी आभार प्रदर्शन केले.