रत्नागिरी
:- जिल्हा खो खो असोसिएशन तर्फे दिनांक 16 जुलै रोजी परांजपे मोतीवाले हायस्कूल ,चिपळूण येथे जिल्हास्तरीय खो खो पंच शिबिर उत्साहात संपन्न झाले,या शिबिरात 75 जिल्हा पंच सहभागी झाले होते.
या शिबिराचे उद्घाटन चिपळूण चे माझी उपनगराध्यक्ष श्री.सुधीर शेठ शिंदे यांनी केले.यावेळी रोटरी चे अध्यक्ष बाळा आंबूरले यांनी श्रीफळ वाढविले.यावेळी महाराष्ट्र खो खो असोसिएशन चे माझी सचिव संदीप तावडे ,श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष सई वरवांटकर,सुहास चव्हाण,मल्लेश लकेश्री,रोटे.नितीन देवळेकर,फैयाज देसाई,राजू दरेकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशन चे सचिव प्रशांत देवळेकर यांनी केले व हे शिबिर घेण्यामागे असलेला उद्देश स्पष्ट केला.सुधीर शेठ शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तसेच रोटरी अध्यक्ष बाळा अम्बूर्ले आणि सई वरवाटकर यांनीही शुभेच्छा दिल्या.या शिबिराचे औचित्य श्री.संदीप तावडे आणि प्रशिक्षक पंकज चवंडे यांचा सत्कार करण्यात आला.
शिबिरामध्ये मार्गदर्शक म्हणून रामराव राठोड ,सुशील वासुरकर,समीर काबदुले,सुहास चव्हाण कृष्णा करजलकर,अंकुश चव्हाण ,पंकज चवंडे आणि प्रशांत देवळेकर यांनी उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.सहभागी सर्व पंचाना प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल पवार यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा खो खो असोसिएशन चे सचिव प्रशांत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंकुश चव्हाण,अरुण शिगवण,मृणाल पवार,सुधीर हुमने ,सनी जाधव, जीतू लाड,यांनी विशेष परिश्रम घेतले.