२०० रोपांचे वृक्षवाटप
रत्नागिरी- छावा प्रतिष्ठान रत्नागिरी च्या वतीने नारशिंगे गावात काल वृक्षारोपण व वृक्षवाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वृक्षारोपण कार्यक्रमात छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे अध्यक्ष सुनिल धावडे यांच्या अध्यक्षेतेखाली सर्व पदाधिकारी व सदस्यांनी रातांबा, चिंच, आवळा, वड, पिंपळ बहुगुणी व बहुउपयोगी अशा १०० वृक्षांची रोपे नारशिगे गावाच्या परिसरात लावण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत च्या माजी सदस्या व शालेय शिक्षण समिती च्या नवनिर्वाचीत अध्यक्ष अंजलीताई आग्रे, उपाध्यक्षा नम्रताताई गोताड, माजी सरपंच वंदनाताई कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष तथा छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे सचिव समिर गोताड, संघटक समीर धावडे, जेष्ठ सल्लागार मोहन पवार, सदस्य सचिन धावडे, संदेश धावडे, प्रकाश गोताड, सुदिप पवार तसेच ग्रामस्थ अनंत धावडे, श्रीपत गोताड, लहू कांबळे, मंगेश मांडवकर, संजय कांबळे, अर्जुन कांबळे, विनायक पवार इ ग्रामस्थ उपस्थित होते.