गुहागर/उदय दणदणे:-गुहागर तालुक्यातील सामाजिक पटलावरील एक अष्टपैलू असामान्य कर्तृत्व असलेलं नेतृत्व मौजे असोरे गाव विकासाचे जनक शांताराम घडशी यांच्या १५ जुलै २०२३ रोजीच्या ८८ व्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनी आजवर केलेल्या समाज कार्यसेवेची पत्रकार-उदय दणदणे यांनी दखल घेत विविध वृत्तपत्रातून लेखप्रपंच केला होता, या माध्यमातून असोरे गावचे समाजसेवक/जेष्ठ लोककलावंत शांताराम घडशी यांनी आजवरच्या जीवन प्रवासात केलेलं भरीव समाजकार्य जनतेपर्यंत पोहोचलं आणि ते दखलपात्रही ठरले.
त्यांच्या वाढदिवस प्रत्यर्थ संपूर्ण दिवसभर कला,शैक्षणिक,सामजिक ,राजकीय सहकार अशा विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात असताना व त्यांचा ८८ वा वाढदिवस साजरा होत असताना शांताराम घडशी आणि समस्त असोरे वासीयांना योग जुळून यावा अशी आनंदाची बातमी मिळाली,शांताराम घडशी यांच्या आज पर्यंतच्या जीवन प्रवासातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र-भारत) रजि.मुबंई -महाराष्ट्र वतीने अध्यक्ष-रविंद्र मटकर, महासचिव-शाहिद खेरटकर, सचीव-सुधाकर मास्कर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ,जेष्ठ लोककलावंत शांताराम घडशी (असोरे-गुहागर) यांना नमन लोककला संस्थेच्या वतीने विशेष “जीवन गौरव पुरस्कार” देण्याचे प्रसिद्ध पत्रकातून जाहीर केले.
शांताराम घडशी यांचं कला,सामाजिक,शैक्षणिक,सहकार क्षेत्रात बहुमुल्य योगदान आहे त्याच पध्दतीने खासकरून नमन लोककलेसाठी त्यां योगदान अतिशय मोलाचं आहे. त्यांनी आजपर्यंत नमन लोककलेसाठी आयुष्य वेचलं मात्र त्याच बरोबर नमन लोककला संस्था या संस्थेच्या व त्याच संस्थेच्या शाखा तालुका गुहागरची निर्मीती साठी ज्या पध्दतीने गुहागर तालुक्याने योगदान दिलं त्या मधे सन्मा.
घडशी साहेब याचं योगदान कुणीही विसरू शकणार नाही. अशा महान मार्गदर्शकांमुळे नमन लोककला संस्था कठीण काळातून सहिसलामत बाहेर येऊन आज संस्थेची घौडदौड चालू आहे. खरं तर ती घौडदौड अशा महान व्यक्तींमुळेच चालू आहे याची जाणीव नमन लोककला संस्थेला आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. शांताराम घडशी यांची वयोमाना प्रमाणे तब्बेत त्यांना आज हवी तशी आता साथ देत नाही. तरी ही ते आपल्या परीने नमन संस्थेच्या कार्या मधे वेळोवेळी सहकार्य देत असतात.
नमन लोककला संस्थेला जे सहकार्य निर्मितीच्या वेळी हवं होतं ते गुहागर तालुक्यातून मिळवू देण्याकामी व नमन लोककलेसाठी दिलेलं अन्य योगदान या सर्व बाबींचा विचार करत त्यांच्या सर्वमान्य सर्वश्रुत कार्याची दखल घेत संस्थेचा महत्वपूर्ण असा जीवन गौरव पुरस्कार त्यांना देत असल्याचे जाहीर करत आहोत.
त्यांच्या एकदरीत परिस्थितीचा विचार करता पुढील वार्षिक कार्यक्रमाची वाट न पाहता खास करून तात्काळ मंगळवार ,दि.०१ ऑगस्ट २०२३ रोजी रात्रौ -८.०० वाजता संस्थेच्या आयोजित दामोदर नाट्यगृह परेल मुंबई – १२ येथील कार्यक्रमावर हा पुरस्कार शांताराम घडशी यांना संस्थेच्या वतीने देण्याचे घोषित करत आहोत,असे संस्थेची अध्यक्ष रविंद्र मटकर यांनी सांगितले. शांताराम घडशी यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी विक्रोळी-मुबंई येथे अनेक हितचिंतकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.उपस्थितांसमोर शांताराम घडशी यांना जाहीर झालेल्या “जीवन गौरव पुरस्कार”प्रसिद्धी पत्रकाचे वाचन करण्यात आले.
वाढदिवसाला कुटुंब सदस्य पत्नी शकुंतला घडशी, विजय घडशी (चिरंजीव) सोनल घडशी (कन्या) रमेश करण (जावई)
कु.गौरी घडशी (नात) त्याचबरोबर कुणबीवाडी विकास मंडळ असोरे(रजि.) मंडळाचे अध्यक्ष- दिलीप बादावटे, सचीव-दीपक वेलुंडे,खजिनदार- दिनेश डिंगणकर, सदस्य-अशोक गोंधळी ,श्रीमती अमृताताई बोंद्रे (साहित्यिक),श्रीमती अनुराधा जुवेकर, चैतन्य बोंद्रे,सुहास निमकर,मनोहर निमकर अशी सहकारी मंडळी उपस्थित होती.
तर आमचे असोरे गावचे आदर्शवत व्यक्तिमत्त्व ,प्रमुख मार्गदर्शक, मंडळाचे संस्थापक:शांताराम घडशी यांना विशेष जीवन पुरस्कार जाहीर करून असोरे गावाचा बहुमान उंचावल्या बद्दल कुणबीवाडी विकास मंडळ असोरे मंडळाचे सचिव-दिपक वेलुंडे यांनी नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र-भारत) रजि मुंबई मध्यवर्ती तसेच संलग्न तालुका शाखा गुहागर कार्यकारणीचे शतशः ऋणी असल्याचे सांगून आभार मानले आहेत.