रत्नागिरी:- कोकण आंबा बागायतदार संघ व रत्नागिरी जिल्हा अंबा उत्पादक संघ पावस व परिसर तसेच आंबा उत्पादक संघ आडीवरे या सर्वांच्या उपस्थित महाकाली पॅलेस येथे 15 जुलै रोजी सभा पार पडली यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी प्रत्येकाने आपली मते मांडली तसेच पर राज्यातून येणाऱ्या हापूस आंबा विक्री करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच जी आय मानांकन नोंदणीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपला सातबारा आधार कार्ड रेशन कार्ड घेऊन आंबा उत्पादक कार्यालयात जमा करण्याच आवाहन करण्यात आलं आहे. आतापर्यंत कोकणातल्या शेतकऱ्यांविषयी कुठल्याही सरकारला शेतकऱ्यांबद्दल जरा देखील आस्था नाही. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासन दरबारी आपल्या हक्कासाठी 25 जुलै रोजी कलेक्टर ऑफिस समोर सर्व आंबा बागायतदार आंबा उत्पादक सर्वांनी हजर राहण्याचा आव्हान रत्नागिरी जिल्हा आंबा बागायतदार संघटनेमार्फत करण्यात आला आहे.आजच्या सभेसाठी उपस्थित प्रकाश साळवी, नंदकुमार मोहिते, दत्ताशेठ तांबे राजू जाधव, मंगेश साळवी, राजू पेडणेकर, ऍडव्होकेट मांडवकर, सचिन आचरेकर, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष सावंत. व पावस परिसरातील सर्व आंबा बागायतदार व उत्पादक उपस्थित होते.