जाकादेवी/ वार्ताहर:-रत्नागिरी तालुक्यातील खालगावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील प्रकाश तुकाराम जाधव हे ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ रत्नागिरी ग्रामीण विभागाच्या वतीने त्यांचा यथोचित शुभेच्छापर जाहीर सत्कार करण्यात आला .
प्रकाश तुकाराम जाधव हे १९९३ पासून रत्नागिरी तालुक्यातील खालगावच्या पोलीस पाटीलपदावर कार्यरत होते.गेल्या ३० वर्षांपासून ते ३१ मे २०२३ पर्यंत त्यांनी अतिशय निष्ठेने काम केले. अतिशय अभ्यासू आणि गावामध्ये सामाजिक सलोखा राखण्यामध्ये त्यांचे योगदान फारच मोलाचे ठरले. प्रकाश जाधव त्यावेळी पाचवी इयत्ता शिकलेले, मात्र सामाजिक व विधायक कामात त्यांना प्रचंड आवड होती. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले प्रकाश तुकाराम जाधव यांनी पोलीस पाटील म्हणून गावात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली.
सेवानिवृत्त पोलीस पाटील प्रकाश तुकाराम जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन रत्नागिरी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फतही त्यांचे अनेकदा कौतुक करण्यात आले होते. खालगाव जाकादेवी कार्यक्षेत्रात त्यांनी सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध ठेवले. इतर काही गावांचा प्रभारी पोलीस पाटील पदाचा कार्यभारही यशस्वीपणे सांभाळला.
सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यावर त्यांचा नेहमीच भर होता. त्यांच्या या कारकीर्दीची दखल घेत महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघटनेच्या वतीने त्यांचा रत्नागिरी कुवारबांव येथे जाहीर सत्कार करण्यात आला दिले.