दिनेश पेटकर/गावखडी:-रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत वृक्षारोपण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मंगेश म्हादये यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी जि.प.पूर्ण आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.उज्ज्वला धामणसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रेमानंद आंबरे , शिक्षणतज्ञ संतोष कुरतडकर,सदस्य नेहा भूते , वर्षा फडके ,क्रांती कुरतडकर,समिधा म्हादये श्रावणी मेस्त्री ,सुजाता गोठणकर, ग्रामपंचायत सदस्य सुनाद गोठणकर,पदवीधर शिक्षक संतोष कडवईकर उपशिक्षक सुभाष काटकर, चंद्रशेखर पेटकर, संजया पावसकर, अंगणवाडी मदतनीस आकांक्षा गुरव ,पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमाच्या प्रारंभीस झाडेच झाडे लावूया ,झाडेच झाडे वाढवूया ,झाडेच झाडे जगवूया अशा विविध घोषणा विद्यार्थ्यांनी देत वृक्षदिंडी जिल्हा परिषद मेर्वी शाळेच्या वतीने काढण्यात आली.तसेच वृक्षांचे महत्त्व पटवून देणारी जनजागृतीपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केली.
प्रास्ताविकात उपस्थित मान्यवरांचा परिचय व कार्यक्रमाचा हेतू उपशिक्षक सुभाष काटकर सर यांनी विशद केला.उपस्थित मान्यवरांचे स्वागत पदवीधर शिक्षिका उज्ज्वला धामणसकर यांनी केले.
वृक्ष महोत्सव जि.प.पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला. शेवटी उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.