जलसंपदा विभागात गट क ,ड वर्गाची 2013 पासुन भरती नाही
रीक्त पदे भरण्यासाठी कोंकण विभाग कृषी पदवी व पदविकाधारक संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्याना निवेदन
रत्नागिरी / खेड : राज्यात जलसंपदा हा विभाग महत्वाचा समजला जातो. मराठवाड़ा व विदर्भ या विभागात दर वर्षी दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते. कोंकण विभागात ही एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाइला सामोरे जावे लागते. पाणी वितरणाचे काम करणारे जलसंपदा विभागात सध्या स्थितीत गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गात मोठया प्रमानात रिक्त पदे असुन यामुळे जलसंपदा विभागाअंतर्गत होणारी अनेक कामे मंदावली असुन, या विभागाचे काम कार्यक्षमपणे होत नाहीत. दुष्काळ व पाणी टंचाईवर मात करायची असेल तर जलसंपदा विभागाची कार्यक्षमता वाढवायला हवी.
त्यासाठी जलसंपदा विभागातील रिक्त पदे भरायला हवीत. या विभागात अनेक वर्षापासुन मोठया प्रमाणात रिक्त पदे असुन गट ‘क’ आणि गट ‘ड’ वर्गाची भरती गेल्या 2013 पासुन झाली नाही. यामुळे या विभागात मोठया प्रमाणात रिक्त पदाची संख्या वाढली आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार गट ‘क’ वर्गाची – सरळसेवा-8014, पदोन्नती- 3163 अशी एकुण- 11177 पदे रिक्त आहेत तर गट ‘ड’ वर्गाची सरळसेवा-4702 तर पदोन्नतीने- 306 एकूण- 5008 पदे 31 मार्च 2023 पर्यंत रीक्त होती. 31 मार्च 2023 ते 30 जून 2023 या काळावधीत या रिक्त पदांच्या संखेत वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने, गट क वर्गातील महत्वाची पदाची रीक्त असलेली संख्या: गट क वर्गातील पदे- प्रथम लिपिक-55,आरेखक-144,भांडारपाल-68, सहाय्यक आरेखक-191, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक-2571,वरिष्ठ लिपिक 705, अनुरेखक-976, संदेशक-190, टंकलेखक-53, वाहनचालक-824, कनिष्ठ लिपिक-1968, सहाय्यक भांडारपाल-181, दप्तरी कारकुन-537, मोजणीदार-951, कालवा निरीक्षक-1471,
जलसंपदा विभागातील गट ‘ड’ वर्गातील मार्च 2023 पर्यन्त रीक्त पदे नाईक-245, शिपाई-2357, चौकीदार-1057,कालवा चौकीदार-784, कालवा टपाली-330, प्रयोगशाला परिचर-152, दप्तरी-6 हि महत्वाची पदे रिक्त आहेत. या विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गाची रीक्त पदे भरण्या संदर्भात 2013 पासुन एक ही जाहिरात न आल्याने रिक्त पदाची संख्या वाढली असुन ही पदे या वर्षीतरी भरावीत अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याच्याकडे कोंकण विभाग कृषी पदवी व पदविकाधारक संघर्ष समितीने निवेदना द्वारे केली आहे.
काळवा निरीक्षक/दप्तर कारकुन/मोजणीदार या पदाची शैक्षणिक अहर्ता बदलुन कृषी पदवी,पदविका करण्याची मागणी:
जलसंपदा विभागात गट क वर्गातील काळवा निरीक्षक,दप्तर कारकुन, मोजणीदार हे पद या विभागात फील्ड वर काम करणारे महत्वाचे पद समजले जाते, या पदाची प्रामुख्याने कालवा परीसाराची देखरेख, शेतकर्याना पाणी वाटप, पाणी चोरी देखरेख, पाणी वाटपाची नोंद,मोजणी अशी कार्य करावी लागतात, मात्र हे पद केवळ 12 वी पास या शैक्षणिक अहर्तेवरुन भरले जाते. 12 वी या शैक्षणिक अभ्यासक्रमात कुठल्या पिकासाठि किती पाणी वाटप, त्याची नोंद ठेवने, मोजणी, कुठल्या मृदेला, पिकाला किती पाणी लागते याचे काहीच अभ्यासक्रम,शिक्षण नसल्याने या पदाच्या कार्यानुसार 12 विचे शिक्षण घेतलेले गुणवत्ता धारक उमेदवार मिळत नसल्याने मोठया प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत, त्यासाठी कृषी पदवी, पदविकेचा अभ्यासक्रमात मृदशास्त्र, पाणी वाटप तालेबंद,पीक पाणी, कुठल्या पिका साठि किती पाणी द्यावे लागते, कृषी शिक्षणामध्ये ग्रामीण विकास,विस्तार शिक्षण,ग्रामीण समाजशास्त्र संबधित विषयाचा संबंध असतो.
तसेच जवळपास कृषीशिक्षण घेतलेले सर्व उमेदवार हे ग्रामीण भागातून आलेले असतात त्याचा ग्रामीण जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध असतो त्यामुळे कृषी शिक्षण घेतलेले उमेदवार 12 वी शिक्षण घेतलेल्या उमेदवारापेक्षा अधिक कार्यक्षमतेने काळवा निरीक्षक, दप्तरी कारकुन, मोजणीदार या पदि कार्य करू शकतात, त्यासाठी काळवा निरीक्षक, दप्तरी कारकुन, मोजणीदार या पदासाठि केवळ कृषी पदवी, पदविका ही शैक्षणिक अहर्ता करण्याची मागणी कोंकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याच्या कडे केली आहे.
जलसंपदा विभागात गट ‘क’ व ‘ड’ वर्गाची भरती 2013 पासुन झाली नसुन या विभागात रिक्त पदाची संख्या मोठया प्रमानात वाढली आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी व राज्यात सिंचन क्षमता वाढवणाऱ्या या विभागाचा प्रश्नानकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. यावर्षी तरी या विभागात मोठया प्रमाणात रिक्त असनारी ही पदे भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याना निवेदन दिले आहे.
2013 मध्ये जलसंपदा विभागाची गट क व गट ड वर्गाची भरती करण्यात आली होती. 10 वर्षात या विभागात नोकर भरती न झाल्याने या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत तातडीने जलसंपदा विभागाच्या रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करावी
जलसंपदा विभागात गट ‘क’ व ‘ड’ वर्गाची भरती 2013 पासुन झाली नसुन या विभागात रिक्त पदाची संख्या मोठया प्रमानात वाढली आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी व राज्यात सिंचन क्षमता वाढवणाऱ्या या विभागाचा प्रश्नानकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. यावर्षी तरी या विभागात मोठया प्रमाणात रिक्त असनारी ही पदे भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याना निवेदन दिले आहे.
विजय अहिरे
कोंकण विभाग कृषी पदवी व पदविकाधारक संघर्ष समिती
2013 मध्ये जलसंपदा विभागाची गट क व गट ड वर्गाची भरती करण्यात आली होती. 10 वर्षात या विभागात नोकर भरती न झाल्याने या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत तातडीने जलसंपदा विभागाच्या रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करावी
विकास धुत्रे
कोंकण विभाग कृषी पदवी व पदविकाधारक संघर्ष समिती