चिपळूण:- चिपळूण नगरपरिषदेने सुका आणि ओला कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू केलं आहे. शहरातील शिवाजी नगर येथील कचरा डेपो मध्ये यासाठी एक वेगळा प्रकल्प उभारण्यात आला आहे. आता गरज आहे ती नागरिकांनी घंटा गाडी मध्ये कचरा वेगळा करून देण्याची. यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे.
यासाठी शहरातील विविध वॉर्ड मधून जनजागृती साठी बैठक घेतली जाणार आहे. जेणेकरून घरातील महिलांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल.
यापूर्वी ओला आणि सुका कचरा याचे वर्गीकरण किंवा त्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा नव्हती. मात्र आता चिपळूण नगरपालिकेने नव्याने सुरू केलेल्या प्रकल्पात खत तयार करण्याची ही व्यवस्था आहे. यामुळे आता नागरिकांनी आपला कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळ्या करून घंटागाडीत द्यावा असे आवाहन चिपळूण नगरपरिषद तर्फे करण्यात आले आहे.