मुंबई:- राज्यातील शिक्षक भरतीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. यानुसार राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
पहिला टप्प्यात ३० हजार आणि दुसऱ्या भरतीत २० हजार भरती केली जाणार आहे.
रिटायर होणाऱ्या शिक्षकांकडून काम करून घेतलं जाणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळा शिक्षक भरती होणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाचा दर्जा खालावल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले होते. याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असेही यावेळी केसरकर म्हणाले. ७० वर्षाच्या इतिहासात आम्ही एवढे मोठे निर्णय घेतले. त्यामुळे शिक्षण दर्जा वाढवला असल्याचेही ते म्हणाले. पवार साहेबांसोबत बैठक घेऊन त्यांना माहिती दिली जाईल, असेही ते म्हणाले.
टीईटी घोटाळ्यामध्ये असणाऱ्या शिक्षकाबाबत आयुक्तांशी विचार विनिमय करून त्याच्या शिक्षक भरती बाबत निर्णय घेणार असल्याचे केसरकर म्हणाले. शाळात विद्यार्थी किती असतात यावर नियंत्रण नसत. सर्व शाळेवर आता कॅमेरे लावले जातील. महाराष्ट्र हिताचे निर्णय घेतले जातील. सेवा निवृत्त घाट घातला नाही तर भरतीला स्टे लागला म्हणून कंत्राटी घेतल्याचे केसरकर म्हणाले.
शिक्षणाचा महाराष्ट्र पॅटर्न संपूर्ण देशात राबवला जातो. प्रत्येक वेळी परस्थिती वेगवेगळी असते. मुख्यमंत्री आमचे आहेत. शेवटी निर्णय मुख्यमंत्री घेतात, असे केसरकर म्हणाले.
दादा सर्वाना चांगला न्याय देतील. तसेच आमचा अधिकार एकनाथ शिदेंवर आहे ते सर्वाना न्याय देतील असेही ते म्हणाले. सर्वाधिक काम मुख्यमंत्री करतात. दोन उपमुख्यमंत्र्यांनी चांगले काम केलं अजून अधिक चांगले काम करतील असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीला कृषिमंत्री हवं आहे तर देऊ असं अब्दुल सत्तार स्वत: म्हणाले. त्यांनी चांगल काम केलं आहे. प्रत्येकाला विचारून खाती दिली असल्याचे केसरकर म्हणाले. खाते बदलताना संजय राठोड यांनादेखील विचारले असेल असेही ते म्हणाले.