BSNL लवकरच 4G सेवा सुरू करणार आहे. एका अहवालात ही माहिती समोर आली आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार, भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या माध्यमातून जून 2024 पर्यंत तामिळनाडूमध्ये 4G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे.
4G सेवांच्या रोलआउटसाठी पायाभूत सुविधांचे काम 18 महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर उपकरणे आणि सॉफ्टवेअरचे वापरासाठी डिसेंबर 2023 पर्यंत बाजारात (Market) येऊ शकते.
BSNL New Plan : BSNL चा नवा प्लान ! 50 रुपयात पाहाता येणार Hotstar, Zee5 सारखे OTT Subscription…
सर्वात आधी तमिळनाडूमध्ये बीएसनलची 4G सेवा
बीएसएनलची 4G सेवा जून 2024 पर्यंत तमिळनाडूत उपलब्ध होईल. जेव्हा स्थापना, चाचणी आणि चाचणीचे टप्पे पूर्ण होतील. त्यानंतर ही सेवा उपलब्ध होईल.
तमिळनाडूनंतर केरळला 4G सेवा मिळण्याची शक्यता आहे. कारण केरळचा बीएसएनलच्या यशात मोठे योगदान आहे. आगामी सेवेचा लाभ घेण्यासाठी BSNL ने ग्राहकांना (Consumer) त्यांच्या सेवा केंद्रांवरून मोफत 4G सिम घेण्यास सांगितले आहेत.
BSNL Recharge : बीएसएनएलच्या ‘या’ प्लानसमोर जिओ-एअरटेलही फेल ! कमी किमतीत 100 दिवसांच्या वैधतेसह मिळतोय 3GB डेटा
लवकरच सुरू होणार 5G सेवा
बीएसएनलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे BSNL ला त्यांची 4G सेवा आपोआप 5G मध्ये बदलता येईल. यासह, 4G सेवा सुरू केल्यानंतर लवकरच उत्तम कनेक्टिव्हिटीसह 5G सेवा सुरू करणार आहे. हायस्पीड इंटरनेट सेवा देणे हा त्यामागचा उद्देश आहे.
रिपोर्टनुसार बीएसएनएल 4G लॉंचनंतर (Launch) लगेचच 5G सेवाही उपलब्ध होणार आहे. BSNL ने 4G लाँच झाल्यानंतर लगेचच त्यांची 3G सेवा बंद करणार आहे. परंतु कंपनी 2G सेवा सुरू ठेवणार असल्यााची माहिती समोर येत आहे. BSNLनुसार, त्यांच्या कमाईचा एक महत्त्वपूर्ण भाग 2G सेवांमधून येतो. जे व्हॉइस कॉलसाठी महत्त्वाचे फिचर आहे.