रत्नागिरी:- रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने ९०५७/०९०५८ क्रमांकाच्या उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला २८ जूनपासून ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.
ही उधना स्पेशल दर बुधवारी उधनातून रात्री ८.०० वा. सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.३० वा. मंगळूर येथे पोहोचेल. परत येताना रात्री ८.४५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.०० वा. उधनात पोहचेल.
मात्र, या ट्रेनच्या उर्वरित फेर्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. १९ जुलैपासूनच्या फेर्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. फेर्या रद्द करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. वसईमार्गे धावणार्या या २२ एलएलबी डब्यांच्या स्पेशलला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव स्थानकात थांबे देण्यात आले होते.