रत्नागिरी/दिनेश पेटकर:- रत्नागिरी शहरातील एका आंब्याच्या झाडाला चक्क जुलै महिन्यात कैऱ्या लागल्या आहेत.
आज पर्यंत आपण फेब्रुवारी ते मे हा आंब्याचा हंगाम मानतो.परंतु निसर्गाच्या किमयाने रत्नागिरीत आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या आहेत.
या कैऱ्या पाहून अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली आहेत.