पाली वार्ताहर:-रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाली, साठरे या गावातील काही ठिकाणी भूसंपादनाच्या मध्ये येऊन बाधित होणाऱ्या विद्युत वाहिन्या ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात आता मुख्य डांबरी रस्ता खणून भूमिगत क्रॉसिंग विद्युतवाहिन्या टाकायला सुरुवात केल्याने त्या ठिकाणी रस्ता खणल्याने तेथे उंच, सखल झाल्याने अपघातांची व रस्ता खचण्याची शक्यता आहे त्यामूळे हे काम पावसाळा संपल्यानंतर सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रवी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने पाली, साठरे गावातील काही ठिकाणी गावातील काही ठिकाणी भूसंपादनाच्या मध्ये बाधित होणाऱ्या विद्युत वाहिन्या ठेकेदाराने आता ऐन पावसाळ्यात मुख्य डांबरी रस्ता खणून भूमिगत क्रॉसिंग वाहिन्या टाकायला सुरुवात केल्याने त्या ठिकाणी रस्ता खणल्याने उंच, सखल भाग झाल्याने रात्रीच्यावेळी तेथे अपघातांची व रस्ता खचण्याची शक्यता आहे.शिवाय रस्ता खोदलेल्या ठिकाणी फक्त मातीचा भराव टाकलेला असल्याने त्याचा चिखल होऊन तेथे छोट्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे त्यामूळे त्या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून डांबराच्या तुकड्यांचा भराव टाकण्याची गरज आहे. उर्वरित ठिकाणचे हे काम पावसाळा संपल्यानंतर सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. शिवाय संपादनाच्या जागेतील बाधित विद्युत खांब नव्याने उभारण्याचे काम ही याबरोबरच सुरू केलेले असल्याने तेथेही खांब उभारताना ओल्या मातीमुळे खड्डा खणताना धोका आहे त्यामूळे स्थानिकांना याचाही त्रास सहन करावा लागत आहे.
येथील स्थानिक ग्रामस्थ,जमीन मालक यांनी या ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींशी या कामाच्या दुरुस्ती बाबतीत विनंती केली असता ते दुर्लक्ष करीत आहेत. याची जिल्हा प्रशासनाने व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, महामार्ग वाहतुक पोलिसांनी नाणीजला याच प्रकारामुळे महामार्ग खचण्याची घटना घडली होती तशी घटना घडण्यापूर्वी किंवा मोठा अपघात घडण्यापूर्वी याची दखल घेऊन ठेकेदाराकडून योग्य त्या उपाययोजना करून पुढील काम पावसाळ्यानंतर सुरू करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.